राष्ट्रवादी रायगड जिल्हा सचिव डॉ. अनंत खराडे यांच्या सह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
तळा : तळा तालुक्यातील आमदार आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे निकट वर्गीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा सचिव डॉ. अनंत खराडे आणि असंख्य कार्यकर्ते यांनी 01 जून रोजी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसा निम्मित शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अनेक गावातील सरपंचासह कार्यकर्ते दररोज पक्ष प्रवेश करत आहेत.
विपुल उभारे युवासेना जिल्हा प्रमुख द. रायगड, ठसाल तालुका प्रमुख, शरद सारगे उपतालुका प्रमुख आणि राकेश वडके शहर प्रमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रवेश निश्चित झाला.
अनेक गावातील विकास कामे पाहून तळा तालुक्यातील डॉ. अनंत खराडे आणि त्यांचे सहकारी यांनी प्रवेश केला आहे.
या वेळी विपुल उभारे युवासेना जिल्हा प्रमुख द. रायगड, ठसाल तालुका प्रमुख, शरद सारगे उपतालुका प्रमुख, राकेश वडके शहर प्रमुख, नमीद पाढरकामे, अँड. चेतन चव्हाण, लिलाधर खातु, अभिजित कदम, सतिश बडे आणि विभागातील शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.
