राजकिय

निजामपूर विभागातील पाणसई करंजेवाडी ग्रामस्थाचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

निजामपूर : रविवार दि.३ डिसेंबर रोजी पाणसई करंजेवाडी येथील श्री. विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, स्वराज्य मिञ मंडळ, महिला मंडळ आणि मुंबईकर मंडळ यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

आमदार भरतशेठ गोगावले यांनी या कार्यक्रमवेळी तुम्ही दोन लाख तीन लाखासाठी आपले इमान विकू नका तुम्हाला मी कायम स्वरूपाची कामे सगळी करून देतो, गेली तीन टर्म मला लोकांनी विकास कामाच्या हीसाबावर निवडून दिले आहे लाख दोन लाख काय आम्ही पाच वर्षानी तुम्हाला एकदा देऊ शकतो परंतु अस नाही ते कुणाला पुरणार आहेत पाणसई मध्ये ८०% कामे ही शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत आणि या पुढे ही ती आम्हीच करणार, करंजेवाडी पाणसई हे ग्रामस्थ स्वयमस्मृर्तिने शिवसेनेत तुम्ही प्रवेश केल्या बद्दल या पुढे तुमच्या सर्व समश्या सोडविण्यत असे बोलताना सांगितले.

पाणसई ग्रूप ग्रमपंचायतीचे माजी. सरपंच विलास शिंदे यांनी बोलतान सांगितले की पाच वर्षे आम्ही निराशे मध्ये होतो, त्याचे कारण पाणसई ग्रामपंचायत त्यावेळी काही फार कमी मतानी गेली होती परंतु तो वचपा आम्ही या निवडणूकी मध्ये काढणार असल्याचे त्यांनी सांगितले असून कार्यकर्त्यांनी आता जोरदार पणे कामाला लागावे असे सांगितले तसेच यावेळी ह्या पक्ष प्रवेश कार्यक्रमवेळी पाणसई करंजे वाडी येथील एकूण १५० च्या वर नागरिकांनी पक्ष प्रवेश केला.

या वेळी रायगड दक्षिण जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना रायगड जिल्हा द. प्रमुख विपूल उभारे, अँड. महेंद्र मानकर, राजाभाऊ रणपिसे, प्रसाद गुरव, पाणसईचे माजी. सरपंच विलास शिंदे, संतोष मोरे, अजित भोनकर, दिलीप नवगणे, नागेश शिर्के, बाळाराम मुंडे, बाळाराम वाळूगडे, लक्ष्मण धाडवे, प्रकाश साळवी, भागाराम धाडवे, मनोज मोरे, सकाराम मोरे, दत्ताराम सांगले, भारत डिंगे, पांडुरंग तेलगे, पदाधिकारी, सदस्य, काळवण, पाणसई, पाणसई करंजे वाडी, भिनाड, मुठवली, आदिवाशी वाडी, बौध्दवाडी मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!