तालुका

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला शहर संघटकपदी विद्या देसाई

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड : बाळासाहेबांची शिवसेना महाड शहर महिला संघटकपदी सौ. विद्या देसाई-वडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

विद्या देसाई-वडके या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक स्व. विलास वडके यांच्या कन्या आहेत.

या नियुक्तीबद्दल महाडचे आमदार भरत गोगावले, तालुका प्रमुख सुरेश महाडीक, संपर्क प्रमुख रवींद्र (बंधू) तरडे, शहर प्रमुख नितीन पावले, संपर्कप्रमुख सिध्देश पाटेकर, शहर संघटक निखिल शिंदे, माजी नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, डॉ. चेतन सुर्वे, सपना मालुसरे, कोमल गोगावले यांनी त्यांचे अभिनंदन केले. आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, महाड शहरात महिला आघाडी भक्कम करण्यावर आपण भर देणार असल्याचे विद्या देसाई-वडके यांनी नियुक्तीनंतर बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!