तालुका
महाडमधील चांभारगड पदपथ बांधण्यास दिरंगाई
रोहिदास नगर मधिल समाज बांधवांनी शासनाकडे हे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे याकरत दिले निवेदन
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड: मौजे चांभारखिंड येथील चांभारगडाचे शिवकाळापासून ऐतिहासिक असे महत्त्व आहे. सदरचे चांभारगड हे रोहिदास समाजबांधवांचे श्रध्देचे व अस्मितेचे प्रतिक आहे, याची दखल घेऊन गडावर जाणेसाठी पदपथ पायऱ्या बांधण्याकरिता आमदार भरतशेठ गोगावले यांच्या स्थानिक आमदार विकास कार्यक्रमा अंतर्गत रक्कम पंधरा लाख रुपये सन २०२०-२१ मध्ये मंजूर करणेत आले असून सदरचे कामी माहे फेब्रुवारी २०२१ मध्ये निविदा प्रक्रियेद्वारे कामाचा ठेका देण्यात आलेला आहे. असे असून सुद्धा संबंधित ठेकेदार या कामाच्या बाबतीत वारंवार टाळाटाळ करीत असल्या कारणाने महाड मधील रोहिदास नगर मधिल समाज बांधवांनी शासनाकडे हे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे असे निवेदन करण्यात आले.



