तुर्भे विभागात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला शब्द आमदार भरतशेठ गोगावले आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने केला पूर्ण
पोलादपूर भागातील आणि मतदारसंघातील सर्व विकासकामे भरतशेठ आणि बाळासाहेबांची शिवसेनाच करणार मुंबईवरून येथे विकास कामे करण्यासाठी कोणीही येणार नाही – आमदार भरतशेठ गोगावले
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
लोकप्रिय कार्यसम्राट आमदार शिवसेना उपनेते- पक्ष प्रतोद श्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या तीन कोटी पन्नास लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ आज दिनांक २८ रोजी करण्यात आला.
यावेळी तुर्भे बुद्रुक तुर्भे खोंडा नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक शिवाजी चौक ते तुर्भे खोंडा रस्ता भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक शेलारवाडी रस्ता भूमिपूजन, तुर्भेबुद्रुक सभा मंडपाचे भूमिपूजन तुर्भे बुद्रुक बौद्धवाडी संरक्षण भिंत भूमिपूजन तुर्भे बुद्रुक गावठाण रस्ता भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक मंगेश गोळे यांच्या घराजवळील साकवाचे भूमिपूजन आणि तुर्भे स्मशानभूमी संरक्षण भिंत उद्घाटन इत्यादी विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, दशरथ उतेकर, संदेश कदम, सरपंच, उप सरपंच आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला मंडळ उपस्थित होते.

या वेळी गोगावले यांनी उपस्थित ग्रामस्थ महिला भगिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही जे जे सांगितले ते आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आम्ही दिलेला शब्द पाळला- पण या पंचक्रोशीतील काही लोकांनी किती शब्द पाळला याचे आत्मपरीक्षण करा, आज कोठ्यावधी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ तुर्भे पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे. आपण पुढेही जे जे सांगाल ते करणार आहोत इथे विकास कामे करण्यासाठी मुंबईवरून कोणीही येणार नाही हे लक्षात असू द्या तुम्हाला ज्या ज्या वेळेस अडचण भासेल त्यावेळेस ही स्टेजवर बसलेली समोरची मंडळी लागेल ते सहकार्य करत आहे, तुमची सर्व विकास कामे आम्ही करत आहोत, तुमच्या अडीअडचणीला सामोरे जात आहोत, मग तुम्हाला आणखी काय पाहिजे आम्ही काहीही चुकीचे करत नाही करणार नाही आम्ही बाळासाहेबांचा वारसा जपण्याचा जोपासण्याचा आणि पुढे नेण्याचा वारसा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेत आहोत असे सांगितले, गोगावले यांनी यावेळी तुर्भे पंचक्रोशी च्या वतीने आमदार गोगावले आणि मान्यवरांचे यांचे आभार मानून स्वागत केले.



