वाघोली येथील काँग्रेस कार्यकर्तेयांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड विधानसभा मतदारसंघ वाळण विभागातील काँग्रेसचे भाऊराव कृष्णा शेडगे, नम्रता भाऊराव शेडगे, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम कृष्णा शेडगे, धर्मेश मोरे इत्यादींनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी जाऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी या प्रवेश कर्त्या समवेत सुरत येथे कामानिमित्त गेलेले असलेले जगदीश मनोहर शेडगे, कृष्णा शेडगे, संकेत शेडगे, आनंद शेडगे, अजय शेडगे, चंद्रकांत शेडगे, सुमित शेडगे, परशुराम शेडगे, सुजल शेडगे, संदीप शेडगे, संतोष मोरे, संकेत मोरे आणि गणेश मोरे यांनी देखील जाहीर प्रवेश केला, या पक्ष प्रवेश समारंभावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, शिवसैनिक संजय शिंदे, विभाग प्रमुख भगवान पवार, युवा सेनेचे शेखर राखाडे, अमर जंगम, सचिन मोरे, लक्ष्मण शेडगे, कौशिक मोरे, सागर संदीप मोरे, चंद्रकांत कालगुडे, सीताराम मोरे, शिवसेना युवा सेनेचे वाळण विभागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.



