लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना यश
सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून सवाद - धारवली - निगडे रस्ता होणार पूर्ण
समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर
पोलादपूर तालुक्यातील भोराव- सवाद -धारवली फणसेकोंड निगडे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज दि २९ रोजी शिवसेना उपनेते आणि पक्ष प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. सदर रस्त्याच्या कामाकरिता शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे सुमारे आठ कोटी रुपये मंजूर करून आणण्यात यश आले, हा रस्ता महाड पोलादपूर ग्रामीण भागातील जनतेकरीता जोडणारा एक दुवा ठरणार आहे, कारण खूप मोठा वळसा घालून या ग्रामीण भागातील लोकांना जावे लागत होते, या रस्त्यामुळे वेळेची बचत होऊन एकमेकांशी संबंध जोडणारा हा रस्ता होणार आहे, त्यामुळे या भागातील जनतेमध्ये खूप आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतजी कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शौकत तारलेकर, सयाजी मांढरे, निगडे ग्रामपंचायत सरपंच कृष्णा खोत, उमेश कालेकर, रवींद्र फुलसुंदर, सवाद ग्रामपंचायत सरपंच सुरेखा गुडबाडकर, माटवन ग्रामपंचायत सरपंच शंकर सागवेकर, काळवली ग्रामपंचायत सरपंच शांताराम महाडिक, आकले ग्रामपंचायतचे झांजे, या भागातील विभाग प्रमुख, उपतालुकाप्रमुख, सरपंच, उपसरपंच शिवसेना युवा सेनेचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार गोगावले यांनी सांगितले की कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत तसेच काही प्रगतीपथावर आहेत या महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे तसेच या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा आम्ही मानस केलेला आहे, असे गोगावले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.



