तालुका

कुसगाव ग्रामपंचायतिच्या माजी सरपंचासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड विधानसभा मतदारसंघातील कुसगाव ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ जोर धरल्यामुळे विविध पक्षातील आणि खास करुन काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आमदार भरतशेठ गोगावले मतदारसंघात करत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवत रोज कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

प्रवेश कर्ते सिराज अब्बास पठाण, दिनकर वसंत उंबरटकर माजी सरपंच, गणेश वसंत उंबरटकर, सुधीर दिनकर उमरडकर, दीपक लक्ष्मण सुतार इत्यादींनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, या पक्षप्रवेश समारंभावेळी मा जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, शिवसेनेचे अख्तर पठाण, ज्ञानेश्वर पवार, सुभाष सुतार, इम्रान पठाण, निलेश गायकवाड, विनायक पवार, पांडू शिंदे तसेच शिवसेना युवा सेनेचे या भागातील कार्यकर्ते पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!