राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : 27 डिसेंबर रोजी रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील बिरवाडी टेमघर येथील कुसगाव फाट्याजवळ झाला अपघात.
यामध्ये महादेव शिवराम मोरे वय वर्ष 48 यांचा जागीस मृत्यू झाला, सध्या ते बिरवाडी भीमनगर येथे राहत होते ते मूळचे बिरवाडी वाकी येथील रहिवासी होते.
घरी येत असताना अज्ञात वाहणाने त्यांना धडक दिली, त्यामुळे त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर जखम झाली आणि त्यांचा जागीस मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्याकडे होंडा ची ड्रीम युगा ही मोटर साइकिल MH 06 बी.क्यू 3537 होती.
अज्ञात वाहनाचा महाड ए. आय. डी. सी. पोलीस स्टेशन कडून तपास सुरु आहे.



