विकासशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन
समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर
रायगड : रायगडचे लोकप्रिय युवा नेतृत्व युवा सेना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, पक्षप्रतोद आणि उपनेते बाळासाहेबांची शिवसेना भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 व 27 डिसेंबर रोजी विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत.

युवकांसाठी भव्य अंडर आम नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा तसेच महाड तालुक्यात प्रथमच भव्य दिव्य अशा 55 हजार बक्षीस असलेल्या पुरुष गट कबड्डी स्पर्धा व महिला कबड्डी स्पर्धा, गृहिणींसाठी महाड व बिरवाडी येथे होम मिनिस्टर फेम खेळ पैठणीचा कार्यक्रम आणि महाड व बिरवाडी येथील सरकारी दवाखाना येथे रुग्णांना फळ वाटप व आश्रम शाळा येथे फळ वाटप.
संपूर्ण आयोजन विकास शेठ गोगावले मित्र मंडळ यांकडून करण्यात येणार आहे.




