महाराष्ट्र

महावितरण ग्राहकांना देणार दरवाढीचा शॉक / MERC कडे 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव

राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

सर्वसामान्य नागरिकांना नवीन आर्थिक वर्षांपासून वीज दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी ‘महावितरण’ कंपनीने आर्थिक भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना नवीन आर्थिक वर्षांपासून वीज दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी ‘महावितरण’ कंपनीने आर्थिक भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आगामी वीजदर आढाव्यात तब्बल 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. तर पुढील दोन वर्षासाठी सरासरी ही दरवाढ 37 टक्के प्रस्तावित आहे. या प्रस्तावामुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणींना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महावितरण कंपन्यांचे ग्राहकांसाठीचे वीजदर पंचवार्षिक असतात. त्यानंतर या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. सध्याचे दर एक एप्रिल 2020 पासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांचा आता मध्यकालीन आढावा घेतला जात असून विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यास या वर्षी एक एप्रिलपासून नवीन दर लागू होऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!