जिल्हा
मोहोत ग्रुप ग्रामपंचायत जलजीवन मिशन अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन संपन्न
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन शुभारंभ संपन्न
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
रायगड : मोहोत ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी मा. जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले, रामचंद्र निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष निकम, भाऊ दिविलकर, ग्रामपंचायत सरपंच संदीप गायकवाड, उपसरपंच, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, सरपंच सौ.पवार, गुडेकर आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



