सानिका केमिकल कंपनीमध्ये सुरक्षा सप्ताहाचा दिन साजरा / या निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन
ध्वजरोहन संजय ठाकुर व रशीद मुंजेवार यांच्या हस्ते
नितेश पवार – ग्रामीण प्रतिनिधी बिरवाडी
महाड : भारतात दरवर्षी ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आता राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणून देखील साजरा केला जातो. देशातील नागरिकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे आणि देशातील दुर्घटना थांबवणे हा दिवस साजरा करण्यामागचे हे प्रमुख उद्देश आहेत. राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना देशभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात. काम करताना घ्यावयाची काळजी, मोठ्या औद्योगिक ठिकाणी काम करताना टाळावयाच्या गोष्टी, तसेच इतर अनेक दुर्घटना टाळण्यासाठी काय करावं लागतं यासाठी मार्गदर्शन केलं जातं.
दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी सानिका केमिकल कंपनीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. या निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.
ध्वजरोहन संजय ठाकुर व रशीद मुंजेवार यांच्या हस्ते करण्यात आले तर शपत विधि घनश्याम कोटकर प्रोडक्शन मैनेजर यांनी दिली, शुन्य हानि चे महत्व कंपनी चे GM एडमिन् शेखर ठाकुर यानी दिले, सूत्र संचालन घनश्याम कोटकर व संभाजी जाधव तर सुरक्षेचे ब्रीदवाक्य गिरीश पोरे यानी दिले.
सुरक्षा विभाग प्रणीत राउत यांच्या मार्गदर्शानख़ाली सपाहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी रशीद मुंजेवर QA मैनेजर, रिहान सनगे, महेन्द्र पिम्पलकर, अक्षय पोटफोड़े, संदीप बोरले, हनुमंत काकडे, सूरज शिंदे, नितेश पवार, राजेंद्र उतेकर, पवन पवार, दिनेश पोकले सर्व डिपार्टमेंट प्रमुख, कर्मचारी बंधू व भगिनी उपस्तित होते.



