लाडवली मोहल्यातील रस्त्याचे भूमिपूजन समारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते संपन्न
जो पर्यंत मी आमदार आहे, तो पर्यंत हिंदू मुस्लिम जातीयवाद होवू देणार नाही - आमदार भरतशेठ गोगावले
सचिन चांदोरकर – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड तालुका लाडवली मोहल्यातील रायगड रोड ते लाडवली मोहल्ला मस्जिद पर्यंत रस्त्याचे भूमिपूजन समारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
तुमच्या भागातील गावातील विकास कामे आम्ही करायची आणि तुम्ही मतदान मात्र दुसऱ्याला करायची इथून पुढे असे होता कामा नये, जर आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला आमच्या सोबत येणे गरजेचे आहे, तरच विकास कामे पुढे मार्गी लागतील अन्यथा तुम्ही खडकावर पाणी टाकल्यानंतर काही उपयोग होत नाही, तसा तुम्ही ज्या पक्षाच्या पाठीवर आहात तसा त्यांना मतदान करून काहीही उपयोग होणार नाही, आम्ही जातीभेद करत नाही आणि जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत तुम्हाला कसलीही चिंता आणि काळजी करण्याचे कारण नाही, आजपर्यंत या मतदारसंघात हिंदू मुस्लिम संघर्ष माझ्या कारकिर्दीत एकदाही झालेला नाही आणि इथून पुढेही होऊ देणार नाही असे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.
यावेळी लाडवली ग्रामस्थ, पधादिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



