ब्रेकिंग
बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू; घात की आत्महत्या, तपासाकडे सर्वांचं लक्ष!

रुपेश चव्हाण – ग्रामीण प्रतिनिधी महाड
महाड : 8 ऑगस्ट रोजी महाड मधील तांबट आळी येथील अल्पवयीन तरुणाचा दुपारी 1.00 वाजन्याच्या सुमारास डोक्याला गोळी लागून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
अल्पवयीन तरुण महाड मधील तांबट आळी येथील महाड शहरातील जुनी नगरपालिकेच्या समोरील इमारती मधील रहिवासी असून श्रेयश सुनील नगरकर हा इयत्ता दहावीत शिकत होता, या तरुणाने दुपारी 1.00 वाजन्याच्या सुमारास सुनील नगरकर यांच्या लायसन धारी बंदुकीने स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण महाड शहर हादरले आहे, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या संपूर्ण घटनेचा तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.



