ब्रेकिंग

छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा एक महिन्यात उभारण्याचे दिले आदेश – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

मुंबई : 7 ऑगस्ट रोजी महाड – पोलादपूर – माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मागणीनुसार आढावा बैठकीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजन करण्यात आले होते.

चंद्रकांत दादा पाटील यांनी कॉलेज मधील विविध तक्रारी संदर्भात मुद्दा उपस्थित करत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवरायांचा पुतळा एक महिन्याच्या आत उभारण्यात आला पाहिजे असे मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला आदेश दिले.

यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कॉलेजच्या विविध मागण्यांना देखील तात्काळ मान्यता दिली, लोणेरे विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.

या वेळी लोणेरे विद्यापीठाचे कुल गुरु, उपकुलसचिव, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच संबंधित अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!