गुन्हेगारी
दोन गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या चार आरोपींना अटक, बीड पोलिसांची कारवाई
अभिजित ढाणीपकार – सहसंपादक
बीड शहरातील चांदणी चौक कंकालेश्वर मंदिर त्याचबरोबर शाहूनगर येथून दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आयपीएस धीरज कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बीड शहरातील काही तरुणांकडे गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कंकालेश्वर मंदिर परिसर त्याचबरोबर चांदनी चौक आणि शाहूनगरमध्ये जाऊन या चार आरोपींना अटक केली.

