महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भाजप नगरसेवक सुरज बामणे यांनी केली बेदम मारहाण

सचिन चांदोरकर – उपसंपादक महाराष्ट्र राज्य
महाड : महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना 08 जुलै रोजी दुपारी भाजप नगरसेवकांकडून त्यांच्या दालनातचबेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे जखमी झाले आहेत. त्यांना महाड ग्रामीणरुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर हे महाड नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनातील त्यांच्या दालनातबसलेले असताना भाजपचे नगरसेवक आणि त्यांचे सहकारी दालनात आले. यावेळी त्यांनी प्रभागातील पाणी प्रश्नाबाबत वादघातला. या वादामध्ये नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका जणाने कोळेकर यांना मारहाण करण्यास सुरुवातकेली. राकेश पाटील याने मारहाण करण्या बरोबरच शिवीगाळ देखील केली.
यावेळी या तिघांनी मारहाण करून तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. यानंतर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनीमहाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या मारहाणीमध्ये धनंजय कोळेकर जखमी झाल्याने वैद्यकीयउपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान महाड शहर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन नगरसेवक सुरज बामणे त्यांचा सहकारी राकेश पाटील आणि अन्य एकअनोळखी व्यक्ती अशा तिघां विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२१ (२), २२१, ३५१ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्यामार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते हे करत आहेत.
