बारसूत जमीन घेणारे सगळेच्या सगळे आडनावं अमराठी कशी काय? सुषमा अंधारेंचा सवाल
भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग
महाड : बारसूमध्ये जेवढ्या लोकांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत ते सगळेच्या सगळे आडनावं अमराठी कशी काय आणि या अमराठी नावांनी भूमिपुत्र असणाऱ्या कोकणवासीयांना हुसकावून लावण्याचा चंग बांधला असेल, तर आपली जबाबदारी असेल की कोकणवासीयांच्या सोबत ठामपणे उभे रहा व सन्माननीय पक्षप्रमुख याच भूमिकेत आज बारसूमध्ये रिफायनरीच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेले होते. त्या प्रत्येकाला विश्वास दिला की बाबांनो तुमच्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व आहे.
भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची शिवगर्जना सभा होत आहे. या सभेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. एमाआयडीसीमधील भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी महाडवासियांना दिला. मडाड एमआयडीसी मधील यांची दादागिरी मोडून काढा असेही त्या म्हणाल्या. येत्या काळात स्नेहल जगताप महाडकरांच्या काळजात राहणारे नाव असेल, असेही त्यांनी सांगितले.



