जिल्हा

शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या मार्फत युगंधर पुरस्कार सोहळा मोठ्या उस्तवात संपन्न 

श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे आणि प्राचार्य निलम हजारे यांना युगंधर पुरस्काराने सन्मानित

आपण केलेले सत्कार्य आपली ओळख निर्माण करते – आमदार अनिकेत तटकरे

जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन

श्रीवर्धन : शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या मार्फत युगंधर पुरस्कार 2022 – 2023 सोहळा 13 मे रोजी मोठ्या उस्तवात संपन्न झाला. श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्रमांक १ येथे युगंधर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे आणि दत्ता पाटील लॉ. कॉलेजच्या प्राचार्य निलम हजारे यांना आमदार अनिकेत तटकरे, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ विनोद घायाळ आणि स्वाती घायाळ यांच्या हस्ते पुरस्कार सन्मानित करण्यात आले.

उपस्थित सर्व मान्यवरांचे शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले.

सदर या प्रसंगी आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला, आणि म्हणाले की आपण केलेले सत्कार्य आपली ओळख निर्माण करते. आजच्या सत्कारमूर्तीने निश्चितच समाजासाठी विधायक कार्य केलेले आहे, प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी आपले प्रशासनातील कौशल्य वापरून निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोना या काळामध्ये प्रशासनातील आदर्शवत काम केले. आणि दत्ता पाटील लॉ. कॉलेजच्या प्राचार्य निलम हजारे यांनी त्यांच्या वीस वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये विविध कामे केली आहेत, जसे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते तसेच यशस्वी स्त्री च्या पाठीशी पुरुष असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. दोन्ही सत्कार मूर्तींचे त्यांनी स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिवरुद्र अकॅडमीच्या वतीने राबवण्यात येणारे उपक्रम स्तुत्य आहे. तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्ध कलेचे शिक्षण आपण देता ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. आणि म्हणाले की राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक मर्यादा पाळतो. जनतेच्या कामांना प्राधान्य दिले जाते, चक्रीवादळ प्रसंगी सर्वसामान्य जनतेला आधार देण्याच्या दृष्टिकोनातून खासदार सुनील तटकरे आणि आमदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांनी जातीने लक्ष घालून काम केलेले आहे. जागृत लोकप्रतिनिधी चांगले अधिकाऱ्यांकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेऊ शकतात असे तटकरे यांनी सांगितले.

दत्ता पाटील लॉ. कॉलेजच्या प्राचार्य निलम हजारे यांनी सांगितले की माझ्या वीस वर्षाच्या शैक्षणिक कामाचा आज गौरव करण्यात आला त्याबद्दल मी आभार मानते, युगंधर पुरस्कार देऊन मला पुढील काळामध्ये अजून चांगले काम करण्याची ऊर्जा मिळालेली आहे.

प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी सांगितले की शिवरुद्र अकॅडमीचे व श्रीवर्धन मधील सर्व जनतेचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी काम करत असताना सर्वसामान्य तळागळातील व्यक्तींपर्यंत प्रशासनातील योजना व प्रशासकीय यंत्रणा पोहोच करण्याचं काम मी केलेला आहे. श्रीवर्धन मध्ये केलेल्या कामाचे युगंधर पुरस्कार हे फलीत आहे. 13 मे हा दिवस माझ्या आयुष्यात सदैव अविस्मरणीय राहील. यशस्वी प्रशासन राबवत असताना समाजातील सर्वसामान्य घटक व सर्वच राजकीय घटक यांनी नेहमी सहकार्य केलेले आहे. मी आपणा सर्वांचा ऋणी आहे.

ज्येष्ठ विधी तज्ञ विनोद घायाळ हे म्हणाले की यांनी महसूल प्रशासन, विधी महाविद्यालय, शिक्षण क्षेत्र या सर्व बाबींवर मार्मिक स्वरूपाचे भाष्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संतोष सापते यांनी केले.

या वेळी तहसीलदार सचिन गोसावी, शिवरुद्र अकॅडमीचे अध्यक्ष शैलेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, श्रीवर्धन मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मोहम्मद मेमन, माजी विरोधी पक्षनेते अनंत गुरव, ज्येष्ठविधीज्ञ किशोर हजारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, अकॅडमीचे सर्व विद्यार्थी, इतर पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी आणि श्रीवर्धन शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!