तालुका

डॉ. अनंत खराडे यांची तळा तालुका युवा सेना अध्यक्ष पदी नियुक्ती

 

सुरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा 

तळा : तळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विश्वासाखातर शिंदे गट शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते. तळा तालुका युवा सेना तालुका अध्यक्ष पदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे, तसे त्यांना नियुक्ती पत्र शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांचे हस्ते देण्यात आले.

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्म विर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधिमंडळ पक्ष प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना प्रमुख विकासशेठ गोगावले यांचे सुचनेनुसार डॉ. अनंत खराडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी युवा सेना रायगड जिल्हा अध्यक्ष विपुल उभारे, सुकुमार तोडलेकर, तळा तालुका शिवसेना अध्यक्ष प्रदुम्न ठसाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!