स्कुल बस धोरणातील तरतुदींचे काटेकोर पालन हवे – दीपक ठाकरे
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड दि. 27 शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कुल बस धोरण २०११ मधीले तरतुदींचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन मोटार वाहन निरिक्षक दीपक ठाकरे यांनी केले.
महाड तालुक्यातील स्कुलबस चालक, मालक, शालेय परिवहन समिती यांची एक संयुक्त बैठक पेण आरटीओ कार्यालयाने महाड येथे आयोजित केली होती. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या गुरुकुल अकॅडमी मध्ये घेण्यात आलेल्या या बैठकला पेण आरटीओ कार्यालयाचे वाहतूक निरिक्षक दीपक ठाकरे, सहाय्यक मोटार वाहनी निरिक्षक विशाल जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील अवसरमोल, गुरुकुलच्या विश्वस्त श्रीमती धारिवाल, महाड परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, पालक, शिकक संघाचे प्रतिनिधी, स्कुल बस चालक मालक, वाहतूक शाखेचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
स्कुल बस धोरण २०११ अन्वये विद्यार्थ्यांची वाहतूक करताना घ्यावयाची सुरक्षा विषयक काळजी आणि नियमांची माहिती यावेळेस देण्यात आली. महाड तालुका अपघात मुक्त करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.



