सेवा पंधरवड्यानिमित्त माणगाव मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
माणगाव : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ०२ ऑक्टोबर पर्यंत सेवा पंढरवड्याचे आयोजन करुन नागरिकांना विविध सेवा पुरवल्या जातात, भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष युवानेते निलेश थोरे यांनी माणगाव मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
सदर रक्तदान शिबीर हे दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायं.०४.०० पर्यंत सरलादेवी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार असून रक्तदान केईएम हॉस्पिटल श्री साई ब्लड बँक यांचे माध्यमातून व नवरात्र मित्र मंडळ माणगाव यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न होणार आहे, सदर उपक्रम यशस्वी होण्याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा व छावा प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाकरीता रक्तदान करून मोदीजींना अभिप्रेत असणाऱ्या शुभेच्छा देऊयात व जास्तीत जास्त रक्तदान करूयात असे आवाहन भाजपा युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी केले आहे. सदर शिबिरासाठी दक्षिण रायगडचे भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आ. धैर्यशीलदादा पाटील, जिल्हा सरचिटणीस सतीशजी धारप, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रशांतजी शिंदे, सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक ऍड. महेश मोहिते व मंडळ अध्यक्ष उमेश साटम,संजय आप्पा ढवळे, सरचिटणीस गोविंद कासार, युवराज मुंढे, राजेंद्र म्हामुणकर, शहर अध्यक्ष नितीन धसवते, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, नगरसेविका ममता थोरे, चिन्मय मोने, रितेश निवाते, आनंद राजभर, विशाल पाशीलकर, शुभम धूपकर, शहर महिला आघाडी भारती शेट, अरुण पेणकर, योगेश पालकर, कौस्तुभ वझे, गणेश भोनकर, परेश सांगले, राजू तेटगुरे, ऍड. ज्ञानेश्वर मराठे, प्राजक्ता शुक्ला, अश्विनी महाडिक, आदेश महाडिक, यशोधरा गोडबोले, नीलम काळे, विधिता मेहता, दिक्षा देसाई, प्रियांका मेहता व माणगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.




