ब्रेकिंग

पुण्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता

 

दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर 

पुण्यासह राज्यात पावसाने अखेर हजेरी लावली आहे. येत्या काही दिवसात मुसळधार पावसाठी शक्यता आहे. त्यामुळे पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी शहर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही भागात मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्यम ते तीव्र आणि अगदी तीव्र पावसाच्या सरी येण्याच्या शक्यता असल्याने या पावसासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या काळात धुक्यामुळे त्रास होऊ शकतो आणि रस्ते निसरडे होऊ शकतात. ज्यामुळे खड्ड्यांची संख्या वाढू शकते. वाहन चालकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं, सावकाश वाहन चालवण्याचं आणि रहदारीच्या भागाकडे जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!