शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे एकूण 1 हजार 275 अर्ज मंजूर
बंटी पाटील – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड
राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत विविध शासकीय दाखले वाटप शिबीर कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.
त्यानुषंगाने “शासन आपल्या दारी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शासन निर्देशानुसार संजय गांधी योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याकरीता विशेष प्रयत्न केले जात आहेत. तालुकास्तरावरही निर्देश देण्यात आले असून तालुकानिहाय इष्टांक पूर्तीसाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर विविध शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करून घेऊन तात्काळ मंजूरी देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
यामुळे लाभार्थ्याच्या संख्येत वाढ झाली असून संजय गांधी योजना, रायगड शाखेची योजनानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना-सर्वसाधारण अे-294 अंतर्गत आलेले एकूण अर्ज 773, मंजूर केलेले अर्ज 657, अपुरे कागदपत्र असलेले अर्ज 99, नामंजूर करण्यात आलेले अर्ज 86.
संजय गांधी निराधार अनुदान योजना-अनुसूचित जाती सी-134 अंतर्गत आलेले एकूण अर्ज 200, मंजूर केलेले अर्ज 198, अपुरे कागदपत्र असलेले अर्ज 2, नामंजूर अर्ज निरंक.
संजय गांधी निराधार अनुदान योजना-अनुसूचित जाती सी-161 अंतर्गत आलेले एकूण अर्ज 78, मंजूर केलेले अर्ज 72, अपुरे कागदपत्र असलेले अर्ज 5, नामंजूर अर्ज 1.
श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना-सर्वसाधारण-3112 अंतर्गत आलेले एकूण अर्ज 476, मंजूर केलेले अर्ज 330, अपुरे कागदपत्र असलेले अर्ज 142, नामंजूर अर्ज 32.
श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना-अनुसूचित जाती सी-143 अंतर्गत आलेले एकूण अर्ज 8, मंजूर केलेले अर्ज 8, अपुरे कागदपत्र असलेले अर्ज- निरंक, नामंजूर अर्ज- निरंक.
श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना-अनुसूचित जमाती सी-172 अंतर्गत आलेले एकूण अर्ज 11, मंजूर केलेले अर्ज 10, अपुरे कागदपत्र असलेले अर्ज 1, नामंजूर अर्ज निरंक.
अशा प्रकारे आलेले एकूण अर्ज संख्या 1 हजार 646, मंजूर केलेले अर्ज 1 हजार 275, अपुरे कागदपत्र असलेले अर्ज 249, नामंजूर अर्ज 119, अशी माहिती तहसिलदार (संगायो), जिल्हाधिकारी कार्यालय, ज्ञानदेव यादव यांनी दिली आहे.



