तालुका
अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटी यांनी अपंग व्यक्ती यांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा संपन्न
बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटी यांनी अपंग व्यक्ती यांच्या हस्ते चिंचोटी मैदानाच्या सभोवताली वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.

गावातील समाजसेवक नरेश बाळाराम पाटील यांच्या सौजन्याने वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या वृक्षारोपणाला तरुणाईचा सहभाग लक्षवेदी होता, संजय पागरे यांनी विशेष आभार मानले.
यावेळी संतोष पाटील, दत्ताराम मोहीते, अमिता ठाकूर, सुजाता पाटील, पार्थ पाटील, चंद्रकांत पाटील, लक्ष्मण पाटील, प्रकाश भांजी, जगदीश कांबळे, नलिनी सासमल, वृषाली पाटील, पांडुरंग निरका, प्रताप पाटील, रजिश्री पाटील, कल्पेश निरकर आणि अरूप भांजी हे उपस्थित होते.



