जिल्हा

रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या ऑनलाईन श्री. शिवगर्जना स्पर्धेत रायगड मधून कु. समर्थ चव्हाण द्वितीय

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

रायगड : 27 फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी घेण्यात आलेल्या श्री शिवगर्जना व शिव वंदना या ऑनलाईन स्पर्धेत विद्या विकास मंदिर नेरळ, कर्जत येथील समर्थ चव्हाण या ई. चौथीच्या विद्यार्थ्यांने श्री शिवगर्जना स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

प्रतिष्ठानने ह्यावर्षी शिवगर्जना आणि शिववंदना ( सामूहिक गीत) या दोन ऑन लाईन स्पर्धेचे आयोजन केले असून सदरील स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातुन अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्याचा निकाल लक्ष्मी भाटिया यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठानचे संस्थापक आदेश लाड, अध्यक्ष समीर टाकले, संपर्क प्रमुख विराज महाडिक, प्रमुख संघटक कैलास गायकर, सांस्कृतिक कार्यकारणी प्रमुख विलास धुमाळ व अमोल वरणकर आदी पदाधिकारी, सभासदांच्या उपस्थितीत श्री शिवगर्जना स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. शुभ्रा सुनिल जाधव ई- पहीली बार्शी, सोलापूर तर द्वितीय क्रमांक कु. समर्थ सचिन चव्हाण इ- ४थी, विद्या विकास मंदिर नेरळ, कर्जत रायगड तसेच शिव वंदना (सामूहिक गीत) स्पर्धेत प्रथम क्रमांक- प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा पाष्टी-गोवेले, म्हसळा-रायगड, द्वितीय क्रमांक- रा.जि.प. शाळा कासारकोंड, श्रीवर्धन रायगड यांना जाहीर करण्यात आले असून विजयी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराज मूर्ति, शिवचरित्र व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचे प्रतिष्ठांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

स्पर्धा कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून यशस्वी करण्यासाठी विलास धुमाळ, अमोल वरणकर, विपुल गायकर, कृष्णा गायकर, योगेश डोंबळे यांनी अपर मेहनत घेतली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!