ब्रेकिंग
आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडसह पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती. अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.



