ब्रेकिंग

चिपळुणात मुसळधार; वशिष्ठी नदी इशारा पातळीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

चिपळूण : रत्नागिरीतील जोरदार पावसामुळे वाशिष्टी नदी आणि खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहू लागल्या आहेत. नदीपात्रातील पाणी चिपळूणच्या काही सकल भागात शिरंल आहे. वाशिष्टी आणि जगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चिपळुणात रात्रीच एन.डी.आर.एफ. पथक दाखल झालं आहे. तसेच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!