ब्रेकिंग

महाड डोंगरी पुलावरील शौचालय केबिन आता नारिकांच्या आरोग्यासाठी ठरत आहे धोकादायक

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : महाड शहरातील बाजारपेठच्या मध्यवर्ती ठिकाणी डोंगरी पुलावरील माहिला व पुरुषांसाठी बसवलेले शौचालय केबिन आता महाड मधील नागरिक व तेथील स्थानिक व्यापाऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

शौचालयास किंवा लघवी साठी येणारे काही नागरिक शौचालय केबिनचा वापर न करता बाहेरच शौचालय व लघवी करतात यामुळे बाजारपेठेच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तिथून ये जा करणारे नागरिक तसेच स्थानिक व्यापारी त्रस्त झाले असून, ह्या मुळे रोगराई वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

स्थानिक व्यापारी व रहिवाशांच्या मागणीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांनी महाड नगरपालिकेला निवेदन दिले असून डोंगरी पुलावरील शौचालय केबिन तिथून हटवण्यात यावे ही महाड नगर पालिकेस नम्र विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!