स्व. माणिकराव जगताप यांच्या जयंती निमित्त व्याख्यान आणि माणिक पुरस्कार सन्मान
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : 29 जुलै रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे स्व. मा. आमदार माणिकराव जगताप यांच्या जयंती निमित्त माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आणि माणिक पुरस्कार सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकविकास सामाजिक संस्था आणि रायगड शिक्षण प्रसारक मंडळ, महाड यांच्या विद्यमान अध्यक्ष हनुमंत (नानासाहेब) जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय देखण्या स्वरूपात कार्यक्रम पार पडला.

महाड आणि पोलादपूर तालुक्यातील MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, यावर्षी चा पहिला माणिक पुरस्कार सिस्केपचे सागर मेस्त्री यांना सन्मान चिन्ह, गौरव पत्र आणि रुपये 25000 देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला.

ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जाधव यांनी केले, सूत्रसंचालन सुधीर भाई शेठ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोन्ही संस्थेच्या पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली, नानासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली अतिशय नेत्रदीपक कार्यक्रम झाला, शेवटी राशीप्र चे कार्यवाह महेंद्रशेठ पाटेकर यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.



