लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा – प्रा. संतोष शिंदे
अनिल अवताडे – तालुका प्रतिनिधी माढा
बेंबळे : गरीब कुटूंबात जन्मलेल्या आणि अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत आपले जीवन व्यथीत करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीचे हत्यार बनवुन साहित्य हे समाज परिवर्तनाचे दूधारी शस्त्र आहे हे सिध्द करुन दाखवले, हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी आजच्या बिघडलेल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवरती मात करुन आदर्श आणि तत्वनिष्ठ समाज घडविण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन प्रा. संतोष शिंदे यांनी केले, ते विमलेश्वर विद्यालय बेंबळे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
आपल्या व्याख्यानात प्रा. संतोष शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जन्मापासून ते मृत्यू पर्यंतचा सर्व संघर्षमय जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला.
यावेळी सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि.जी. किर्ते यांनी तर आभार प्रदर्शन एल.व्ही. भोसले केले.
या वेळी संस्थेचे संस्थापक गोविंद भोसले, तात्यासाहेब पवार, संस्थेचे उपाध्यक्ष नागेश मस्के, संचालक यशवंत भोसले मुख्याधिपिका स्वातीताई पाटील मँडम आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



