ब्रेकिंग

पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच

नऊ हजार कंत्राटी कर्मचारी संपावर

 

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा

मुंबई : बेस्टच्या घाटकोपर डेपोमधील कंत्राटी चालक काल सकाळपासून संपावर गेले आहेत. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, आणि, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर गेले आहे. याचा फटका मात्र सामान्य मुंबईकरांना बसतोय.

पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधांची मागणी हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते.या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत . आपल्या मागण्यांवर हे सर्व कर्मचारी ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहिल असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

सध्या बेस्टमध्ये अंदाजे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी आहे. हे नऊ हजार कर्मचारी संपावर असल्याचा दावा कंत्राची कर्मचारी संस्थेने केला आहे. यामध्ये एसएमटी – एटीपीएल असोसिएटचे दोन हजार कंत्राटी कर्मचारी, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे तीन हजार कंत्राटी कर्मचारी, हंसा ग्रुपचे दीड हजार, टीएमएल ग्रुपचे दोन हजार, ओलेक्ट्रा ग्रुपचे 500 इतके खाजगी कंत्राटी कर्मचारी आहेत. कंत्राटी कामगारांच्या संपाचा फटका घाटकोपर, देवनार, आणिक, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी आगार, सांताक्रुज आगार, मजास आगार या आगरांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या अगोदर देखील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. प्रशासनाने आपला आर्थिक भार कमी करण्यासाठी बस आणि चालकांची कंत्राटदारांकडून नियुक्ती केली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून असंतोष निर्माण झाला आहे. यामध्ये वेळेवर पगार न होणे, नियुक्तीपत्र न देणे आदींसारखे मुद्दे आहेत. सलग दोन दिवस काम बंद आंदोलन सुरू असल्याने मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!