ब्रेकिंग

चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग

सागर पवार - मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

 

चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने आज सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर लँडिंग केले. इस्रोच्या अथक परिश्रमानंतर भारताने अंतराळात इतिहास रचलाय. भारताच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर भारतामध्ये जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे. गाव खेड्यापासून शहरापर्यंत भारत माता की जय असे नारे दिले जात आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छा दिल्या जात आहे. पण विक्रम लँडर चंद्रावर पोहच्यानंतर पुढे काय? चांद्रयान 3 चा पुढील टप्पा काय असेल ? विक्रम चंद्रावर कसे काम करेल… भारताला माहिती कशी पाठवली जाईल ? याची चर्चा सुरु आहे.

भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची… भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेलीय… ऊर आनंदाने भरून आलाय… आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय… ‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे.

भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे… भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या… जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली… श्वास रोखले गेले… हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले… आणि बातमी आली… चांद्रयान- ३ मोहीम फत्ते झाली… प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले… आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले… आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!