महाड विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन कामांची आढावा बैठक संपन्न
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड, पोलादपूर मधील जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या विकास कामांचा आढावा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बस्तेवाड यांच्या मार्ग्दशानाखाली घेण्यात आला.
आढावा बैठकीत प्रत्येक गाव, वाडी वस्ती निहाय योजनांची विस्तृत चर्चा, सध्यस्थिती, त्या पूर्ण करताना येणाऱ्या काही अडचणी अशा अनेक विषयांवर मंथन करण्यात आले, प्रामुख्याने मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
- प्रत्येक गावात मंजूर योजनेची सध्यस्थिती आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची सूचना या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने दिली.
- ज्या गावात योजना अपूर्ण असतील किंवा काही अडचणीमुळे रखडल्या असतील अशा योजना तातडीने चालू करून पूर्ण करण्याचे आदेश माझ्या आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या.
- ज्या अडचणी आहे त्या ताबडतोब शासन स्तरावर सोडवून योजन चालू करण्याचे आदेश देण्यात आले.
- काही योजनांमध्ये सर्वे करताना ज्या गोष्टी समाविष्ठ केल्या नाहीत, त्या गोष्टी समाविष्ठ करण्याचे आदेश शासनास करण्यात आले.
- जल हि अतिशय महत्वाची जीवनावश्यक आहे आणि या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणाबर सुटणार आहे त्यामुळे या योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत कोणतेही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट आदेश शासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांना देण्यात आले.
- ज्या ज्या ठिकाणी अडचण येईल त्या त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.
- ज्या तळमळीने आणि तत्परतेने अगदी विस्तृतपणे प्रत्येक गावातील योजनेचा आढावा घेत आहोत याचे कारण पाण्याचे महत्व अधोरेखित आहे.
सदर बैठकीस रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, त्याचप्रमाणे महाड- पोलादपूर-माणगाव तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे शासकिय अधिकारी, महाड, पोलादपूर, माणगाव मधील सरपंच, ग्रामसेवक आणि तिन्ही तालुक्यातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



