तालुका

आमदार भरतशेठ गोगावले यांना राखी बांधण्यासाठी हजारो भगिनींची उपस्थिती

महिला भगिनींचे सक्षमीकरण हेच ध्येय : आमदार भरतशेठ गोगावले

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड: शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आमदार भरतशेठ गोगावले यांच्या बिरवाडी ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदार संघातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला भगिनींचे प्रेम व मातांचे आशिर्वाद असल्यानेच सर्व सामान्य शेतकर्‍याचा मुलगा तीन वेळा आमदार झाला, राज्यातील महिलांचे सक्षमीकरण व बळकटी करण्यासाठी आमचे सरकार कटीबध्द असून मतदार संघातील महिला भगिनींचे सक्षमीकरण हेच आपले ध्येय असून कुठल्याही भगिनीवर संकट हा भाव मदतीसाठी धावून येईल असे अभिवचन आमदार भरतशेठ गोगावले यांनी मतदार संघातून हजारोंच्या संख्येने आलेल्या भगिनींकडून राखी बांधून घेतल्या नंतर बोलताना दिले.

आ. गोगावले हे नेहमीच जनतेच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात, मतदार संघातील वाडी वस्तीवर विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असून दिवसातील १८ तास ते जनते मध्ये असतात. याचमुळे आ. गोगावले यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आज त्यांना राखी बांधण्यासाठी मोठ्या संख्येने भगिनी उपस्थित होत्या.

या सर्व भगिनींना आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वतीने भेटवस्तु देखील देण्यात आल्या, यावेळी सुषमाताई गोगावले, महिला संघटिका सपना मालुसरे, महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई, कोमल गोगावले, प्रेरणा सावंत, पुजा जाधव आदी महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!