ब्रेकिंग

राजेवाडी येथे गोवंश हत्या, महाड मध्ये तणावपूर्ण शांतता 

पोलीस प्रशासन मार्फत संबंधितांविरोधा कारवाई चे संकेत / नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- डी.वाय.एस.पी शंकर काळे यांचे आवाहन

 

राजेवाडीसह महाड मधील परिस्थिती नियंत्रणाखाली

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : महाड तालुक्यातील राजेवाडी येथे गाईची खुले आम कत्तल करण्यात आली, या ठिकाणी गोरक्ष यांना माहिती मिळताच गो हत्या करू नका असे सांगत असताना गोरक्ष यांना गावातील इतर नागरिकांना बोलवून घेरण्यात आल्या, त्या नंतर गो रक्षक यांना सोडविण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना, पत्रकार आणि एका पोलीस कर्मचारी यास मारहाण झाल्याची घटना बुधवारी रात्री च्या सुमारास घडली.

गुरुवारी सकाळी गोरक्षक व समस्त गोमाता प्रेमी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कत्तल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलीस प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत कायदा सुव्यवस्था मध्ये बाधा येणार नाही असे सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलीस विभागीय अधिकारी शंकर काळे यांनी केले, परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे स्पष्ट केले.

महाड शहरात तसेच राजेवाडी परिसरामध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, महाड तालुक्यातील राजेवाडी गावात बुधवारी रात्रीच्या सुमारास 3 मुक्या जनावरांची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती महाड पोलादपूर मधील गो रक्षक यांना मिळताच त्यांनी तातडीने धाव घेतली, झाल्या प्रकारची गंभीर नोंद घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे, या दरम्यान रायगडचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने महाडला भेट देण्यासाठी येणार असल्याचे डी.वाय.एस.पी शंकर काळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

नागरिकांनी शहरात होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता मिळणाऱ्या बातम्या संदर्भात पोलीस प्रशासनाशी थेट संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत डी.वाय.एस.पी शंकर काळे यांनी जनतेला केले आहे, तालुक्यात सद्यस्थितीमध्ये संपूर्ण शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!