तालुका

किये गावात जलजीवन योजने अंतर्गत ६२ लक्ष खर्च करून होणार नळ पाणी पुरवठा योजना

या योजनेचे भुमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते

महाड विधानसभा मतदार संघात विकास कामांचा धडाका

स्वप्नील ढवण – उपसंपादक

महाड – पोलादपूर – माणगाव मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरू असून आज महाड तालुक्यातील किये गावातील किये वाडकर पठार या गावासाठी शासनाच्या जलजीवन योजने अंतर्गत  जवळ जवळ ६२ लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभकिये खोत वाडी येथे करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, शिवसेना महाड तालुका सह संपर्क प्रमुख प्रमोद गोगावले, किये ग्रामपंचायत सरपंच नारायण  वाडकर, उप सरपंच शितल मालूसरे, पांडूरंग वाडकर, विष्णू गोगावले, निलेश गोगावले, संजय नांगले, मनेष मालूसरे, परशुराम वाडकर, राजेंद्र सोळंम, तानाजी वाडकर तसेच खोत वाडी आणि वाडकर पठार येशील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपसस्थित होते.

यावेळी बोलत असताना ग्रामस्थांना सांगीतले की किये गावात या पूर्वी देखिल तलाव आणि रस्ता सुविधा दिल्या आहेत परंतू आता जुन्या तलावाची पडझड झाली असल्याने पुन्हा नव्याने या गावाला शासनाच्या जल जीवन योजने अंतर्गत ६२ लाख रुपये खर्च करून पुन्हा नळ पाणी पुरवठा योजना करत आहोत, त्याच प्रमाणे गावातील आणखी वाड्यांना देखिल काही कमी पडून देणार नाही या पूर्वी यागावाला टेंकर द्वारे पाणी पुरवठा करायला लागत होते, मात्र आपण आता आपल्या गावाला टेंकर मुक्त केले आहे त्याच प्रमाणे किये गावाला येणार्या रस्त्यावर देखिल आपण सहा कोटी रुपये खर्च केले आहेत त्यामूळे पुढील रस्ता देखिल येणाऱ्या काळत पुर्ण करणार असल्याचे सांगितले त्यामुळे गावकर्यांनी देखिल आपले वैयक्तीक हेवे दावे बाजूला ठेवून काम करावे असे आवाहन कीवे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!