महाराष्ट्र

छायाचित्रकाराचा राज्यस्तरीय स्पर्धेत महाडचा कल्पेश पाटील प्रथम

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

वर्ल्ड टुरिझम डे च्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि भारतीय पर्यटन विकास को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत महाडच्या तरुण फोटोग्राफर कल्पेश पाटील याच्या फोटोने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.

दि. 8 ते 10 सप्टेंबर कालावधीत पुणे येथे झालेल्या फेस्टिवल सोहळ्यामध्ये इंडिया टुरिझम बोर्डच्या असिस्टंट डायरेक्टर सौ. अपर्णा आठल्ये यांच्या हस्ते कल्पेश पाटील यास हे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यभरातून अनेक फोटोग्राफर्सनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता त्यातून कल्पेशने मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे. कल्पेश गेले आठ ते दहा वर्षांपासून महाड शहरात फोटोग्राफीचा व्यवसाय करत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी सौ. अपर्णा आठल्ये यांसह सोना साहेब (आयआरसीटीसी), मनोजकुमार डॅनियल ( डीजीएम पुणे मेट्रो ), झेलम चौबळ ( संचालिका केसरी टूर्स ) तसेच पुणे येथील सर्व ट्रॅव्हल असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!