तालुका

सुकट गल्लीतील स्वच्छतागृहांची दूरवस्था

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड : महाड शहरातील सुकट गल्लीत असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहांची प्रचंड दूरवस्था झाली आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी याबाबत एक निवेदन महाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोकडे यांना दिले. या ठिकाणी तातडीने नवी स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या स्वच्छता गृहांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्याच प्रमाणे गतवर्षी आलेल्या पुरानंतर या ठिकाणी कोणतीही साफसफाई करण्यात न आल्याने ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. नागरिक या स्वच्छता गृहाबाहेरच नैसर्गिक विधी करित असल्याने परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता गृहांअभावी या परिसरात राहणाऱ्या महिलांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.

ही बाब विचारात घेवून या ठिकाणी त्वरीत नवी स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी दीपक चव्हाण यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!