आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वाणिज्य उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे संपन्न
परेश दुधाणे – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासन प्रस्तावित वाणिज्य सप्ताहमध्ये उद्योग विभागाच्या समन्वयाने आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत वाणिज्य उत्सव या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय रेल्वे, खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब, राज्याचे उद्योग मंत्री सुभाषजी देसाई साहेब आणि पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. यावेळी उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, कार्यक्रमाचे आयोजक जीजेईपीसी चे संजय शहा, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष विजय कलंत्री आदी. मान्यवर उपस्थित होते.

जागतिक निर्यातीचे केंद्र म्हणून देशाची ओळख व्हावी. त्यासाठी प्रत्येक राज्याच्या प्रमुख निर्यातीत वाढ होण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सहभाग २२ टक्क्यांहून अधिक आहे. हा सहभाग अधिक वाढावायासाठी कृषि, वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय यावर आधारित अनेक लोकप्रिय स्थानिक उत्पादनांना पुढे आणण्यासाठी वन डीस्ट्रीक्ट वनप्रोडक्ट मॅग्नेटीक महाराष्ट्र सारख्या उपक्रमांतून राज्य एकूण निर्यातीत कायम अग्रेसर राहिल, तसेच संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल अशी महाराष्ट्राची भूमिका राष्ट्रीय पातळीवर असेल असा विश्वास व्यक्त केला. मोठ्या उद्योगांसह सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांना प्रोत्सहनदेण्याचे कार्य राज्य शासन करीत आहे. या नवनव्या उपक्रमांतून अर्थचक्र गतिमान ठेवण्यात उद्योग विभाग सदैव कार्यरत आहे.

