जिल्हा

आंबेशिवथर येथील आजी माजी सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : महाड विधानसभा मतदारसंघातील आंबे शिवथर येथील उबाठा गटातील सरपंच मारुती सहदेव सकपाळ उर्फ पप्पा, उपसरपंच किशोर पांडुरंग गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य गोविंद दाजीबा चौधरी, माजी सरपंच सुरेश भागोजी मालुसरे, विलास नानगुरे, चिंतामणी जाधव, सुरज पवार गणेश गायकवाड, शैलेश, मालुसरे इत्यादींनी शिवसेनेत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी प्रवेश कर्त्यानी सांगितले की अनेक वर्ष काँग्रेस आणि आता उबाठा मध्ये राहून देखील कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नाही, जी कामे झाली आहे ती फक्त शिवसेना आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्याच माध्यमातून झाली आहेत असे प्रवेश कर्त्यांनी सांगितले, यावेळी प्रवेश कर्त्यांचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी भगवे पताका घालून शिवसेना पक्षात स्वागत केले.

या वेळी माझी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, वरंध गण संपर्कप्रमुख लक्ष्मण भोसले, युवा सेना विभागप्रमुख संजय गुरव, शाखाप्रमुख काशिनाथ मालुसरे, माजी सरपंच विठ्ठल मालुसरे, अरविंद मालुसरे, शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!