जिल्हा

रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात

प्रवासी बस दरीत कोसळली | 3 मृत्यू तर 34 जखमी

जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन 

रायगड : म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाआहे, ही बस 8 मे 2022 रोजी आठच्या सुमारास साठ फूट खोल दरीत कोसळली आहे.

या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 34 जण जखमी झाले आहेत, जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितले आहे.

अपघातग्रस्तांचा मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली आहे, सर्व यंत्रणा तात्काळ मदात कार्यास लागली आहे.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्ययंत्रणेला निर्देश दिले आहेत.

नालासोपारा येथून एक खाजगी बस निघाली होती, तिचा घोणसे घाटात अपघात झाला आहे, MH 04 FK 6616 असा या अपघात झालेल्या गाडीचा नंबर आहे, बस पुलावरुन 60  फूट खाली कोसळली, या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून श्रीवर्धन येथील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाणे येथे राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे, या दरम्यान मृतांची ओळख पटविण्याबाबत ची कार्यवाही व तपास सुरु करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!