ब्रेकिंग

महाडमध्ये ब्लू जेट केमिकल कंपनीत भीषण आग, 11 कामगार अडकले, 5 जण रुग्णालयात

 

समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर 

रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील ब्लू जेट केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ब्लू जेट कंपनीत लागलेल्या आगीत 11 कामगार अडकल्याची माहिती आहे, तर पाच कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि महाडचे प्रांताधिकारी दाखल झाले आहेत.

महाड एम.आय.डी.सी मध्ये ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीत सकाळी 11 च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचं असल्याचं क्षणार्धात लक्षात आले. या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरु झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरू लागली. यामध्ये कंपनीतील काही कर्मचारी अडकल्याची भीती आहे.

या स्फोटानंतर आगीने क्षणार्धात पेट घेत, सगळीकडे आग पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीसानीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या गॅसगळतीमुळे एका कामगाराची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.

11 जण अडकले, 5 जणांवर उपचार दरम्यान, महाड आग दुर्घटनेमध्ये 11 जण अजूनही अडकून पडल्याची माहिती आहे. तर पाच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. या कंपनीत 57 कामगार काम करत होते. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल आहेत, अशी माहिती महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिली. या अग्नितांडवात कुणीही दगावल्याची पुष्टी महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी केलेली नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!