पळसगांव बु. ग्रामपंचायतवर भाजपाच्या ऍड. सोनाली नितीन आंब्रे बहुमताने विजयी
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
माणगाव : माणगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऍड. सोनाली नितीन आंब्रे ह्या भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत, माणगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीने अतिशय ताकदीने ठराविकच ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने असलेल्या नागाव ग्रामपंचायत वर भाजपचे यशवंत कासरेकर हे चुरशीच्या लढतीत थेट सरपंच पदी निवडून आले तर पळसगांव येथे मतदारांनी एकतर्फी विजयभाई आंब्रे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ला प्रचंड जनमत देऊन भाजपाच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार ऍड. सोनाली नितीन आंब्रे यांना व सहा सदस्यांना निवडून दिले तर उणेगांव ग्रामपंचायतमध्ये चार पैकी तीन सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. रातवड ग्रामपंचायत मध्ये भाजपचा एक सदस्य निवडून आला आहे.

भाजपने अत्यंत नियोजनबद्ध कामगिरी केल्याने माणगांव तालुक्याच्या राजकारणात भाजपचा दमदार प्रवेश झाला असून येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांची डोकेदुखी वाढणार आहे.




