जय भवानी स्पोर्ट्स क्लब दिघी कोळीवाडा आयोजित दिघी कोळीवाडा प्रिमियर लीग स्पर्धा संपन्न
जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
दिघी : जय भवानी स्पोर्ट्स क्लब दिघी कोळीवाडा आयोजित दिघी कोळीवाडा प्रिमियर लीग 2023 पर्व पहिले भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली.
आमदार भरतशेठ गोगावले आणि कोअर कमिटी सदस्य युवासेना / युवासेना सचिव कोकण विभाग विकासशेठ गोगावले यांच्या भक्कम पाठबळामुळे तसेच जय भवानी स्पोर्ट्स क्लबच्या सर्वच पदाधिकारी, सदस्य आणि खेळाडूंच्या अथक मेहनतीने ही स्पर्धा गेली 5 दिवस यशस्वीरीत्या संपन्न झाली.
दिघी कोळीवाडा येथील ग्रामस्थ, महिला, तरुण, छोटे क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांच्या उत्साही सहभागामुळे ही स्पर्धा दिमाखदार स्वरूपात पार पडली.
विजेत्या संघांना भव्य चषक व आकर्षक बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-युवासेना संघटनेच्या माध्यमातून दिघी कोळीवाडा या गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल हा विश्वास व्यक्त केला.
या वेळी युवासेना जिल्हा प्रमुख द. रायगड विपुल दिलीप उभारे, युवासेना महाड विधानसभा प्रमुख वैभव मोरे, श्रीवर्धन उपतालुका प्रमुख शब्बीरभाई उंडरे, युवासेना तालुका प्रमुख सागर इंगळे, युवा नेते अभिजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.



