जिल्हा

रायगड महासंस्कृती महोत्सव – 2024 चे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-- जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड दि. 9 सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन आयोजित रायगड महासंस्कृती महोत्सव-2024 चे दि.12 फेब्रुवारी ते दि.16 फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी 4 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत पोलीस परेड मैदान अलिबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

आगरी, कोळी संस्कृतीसह विविध लोककला याबरोबरच विशेष निमंत्रितांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि.12 फेब्रुवारी रोजी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा शिवकालीन संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मर्दानी खेळ, पोवाडे यांचा समावेश आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अवधूत गुप्ते यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.

दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा कोळी संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अशोक हांडे यांचा मराठी बाणा कार्यक्रम होणार आहे. दि.14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत पारंपारिक लोकनृत्य कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत नंदेश उमप यांचा महाराष्ट्राची संस्कृती कार्यक्रम होणार आहे. दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत स्थानिक कलावंताचा दशावतार कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत रत्नकांत जगताप यांचा महाराष्ट्राची लोकधार संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.

दि.16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत स्थानिक कलावंताचा आगरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत महानाट्य शिवबा होणार आहे, या महोत्सवात विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!