राजकिय

गारळ मधील असंख्य ग्रामस्थांचा शिवसेने मध्ये जाहिर प्रवेश

 

राजेंद्र गवसकर – तालुका प्रतिनिधी माणगाव

माणगाव तालुक्यांतील मोर्बा जिल्हा परिषद गणातील लोणशी ग्रामपंचायत हद्दीतील गारळ ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहिर पक्षप्रवेश, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, डॅशिंग जिल्हाप्रमुख अनिलजी नवगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश करण्यात आला.

गौरी गणपतीच्या सणामध्ये मुंबई मंडळ व गारळ फौजदार भावकी ग्रामस्थ हे अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेज पक्ष या मध्ये होते, परंतु विकासशून्य कारभाराला कंटाळून अखेर गारळ ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे माणगाव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या ग्रामपंचायतीतच शंभरहून अधिक ग्रामस्थांनी प्रवेश केल्याने शिवसेनेकडून राष्ट्रवादीला येन गणपतीच्या सणात धक्का बसल्याचे बोलले जात आहे. गारळ ग्रामस्थांचा विकासाचा प्रश्न यापुढे शिवसेनेकडून सोडवला जाईल, गारळ मधील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेमध्ये योग्य तो मान सन्मान देखील दिला जाणार असल्याचे शिवसेना दक्षिण रायगडचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले. यावेळी गंगाराम जुमारे, बाबु जुमारे, सहदेव जुमारे, संदेश जुमारे, संदेश जुमारे, युवराज जुमारे, सदानंद जुमारे, तुकाराम जुमारे, तुकाराम जुमारे, सिताराम जुमारे, दत्ताराम जुमारे, परशुराम जुमारे, महादेव जुमारे, कृष्णा जुमारे, सहदेव जुमारे, संदिप जुमारे, मंदा जुमारे, सरशी जुमारे, मीना जुमारे यांच्यासह तरुण मंडळ, महिला मंडळ व ग्रामस्थांनी प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!