जिल्हा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

सागर पवार - मुख्य व्यवस्थापकीय संपादक

 

ठाणे, कल्याण : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट महा मेडिकल कॅम्प कल्याण येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे उपाध्यक्ष डॉ. वाघ यांनी सदर शिबिराचे आयोजन केले होते. सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्याचा लाभ मिळावा व त्यांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये जापानीज मशीनद्वारे संपूर्ण आरोग्य तपासणी, पथोलॉजी लॅब तर्फे रक्त तपासणी, दंतरोग तज्ञ डॉक्टर बोराडे यांच्याकडून दातांची तपासणी व टेक्निशियन प्रकाश वाघ यांनी डोळ्यांची तपासणी केली. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.या शिबिरामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी एस वाघ, उपाध्यक्ष डॉक्टर सुरज चौधरी, डॉक्टर महाजन सर, सविता वाघ, युवराज खैरनार, डॉक्टर ललित बोराडे, श्री प्रकाश वाघ, योगेश पाटील, पूजा वाघ, शर्मिला गायकवाड तसेच पॅरामेडिकलचे सर्व विद्यार्थी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!