तपो निधी गुरुवर्य अरविंदनाथ महाराज यांची हृदयविकार शस्त्रक्रिया (बॉम्बे रुग्णालयात) यशस्वीरित्या संपन्न
हृदयविकार शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्याकरीता आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिले विशेष लक्ष
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
मुंबई : तपो निधी गुरुवर्य अरविंदनाथ महाराज यांची हृदयविकार शस्त्रक्रिया बॉम्बे रुग्णालयात यशस्वीरित्या पूर्ण झाली.
बाबांचे शिष्य आणि आमदार भरतशेठ गोगावले हे स्वतः जातीनिशी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून लक्ष देत होते, शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवर्यांच्या तब्येतीची बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन विचारपूस करून संबंधित डॉक्टरांशी बाबांच्या तब्येतीसंदर्भात चर्चा करत स्वतः लक्ष देण्यासाठी विनंती केली.
बाबांची शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे कक्ष अधिकारी मंगेश चिवटे यांनी विशेष लक्ष देऊन मुख्यमंत्री सहायता निधी मधून देण्यात येणारे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी विशेष लक्ष देऊन सहकार्य केले.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी यासाठी मंगेश चिवटे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, गुरुवर्य तपो निधी महाराज यांची तब्येत आता ठीक आहे लवकरच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊन तब्येत ठणठणीत झाल्यानंतर ते आपल्या भक्तगणांना भेटण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी लवकरच येतील अशी अपेक्षा बाबांचे शिष्य आमदार भरतशेठ गोगावले यांनी ईश्वरचरणी प्रार्थना करत व्यक्त केली.



